क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागयोग - श्लोक श्लोक 8, 9, 10, 11, 12

क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागयोग

श्लोक 8, 9, 10, 11, 12

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् |

आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ||१३-८||

इन्द्रियार्थेषु वैराग्यमनहंकार एव च |

जन्ममृत्युजराव्याधिदुःखदोषानुदर्शनम् ||१३-९||

असक्तिरनभिष्वङ्गः पुत्रदारगृहादिषु |

नित्यं च समचित्तत्वमिष्टानिष्टोपपत्तिषु ||१३-१०||

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी |

विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि ||१३-११||

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् |

एतज्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोऽन्यथा ||१३-१२||

अनुवाद

इह व पर लोकांतील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे ॥ १३-८ ॥ पुत्र, स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे ॥ १३-९ ॥ मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकान्तात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे ॥ १३-१० ॥ अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे, हे सर्व ज्ञान होय, आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे. ॥ १३-११ ॥ जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, ते चांगल्या प्रकारे सांगतो. ते अनादी परम ब्रह्म सत् ही म्हणता येत नाही आणि असत् ही म्हणता येत नाही ॥ १३-१२ ॥

केवळ वाचनापेक्षा अधिक—
तुमचे स्वतःचे ध्यान व्हिडिओ तयार करा.

पवित्र श्लोकांना जगासोबत शेअर करण्यासाठी सुंदर, सिनेमॅटिक व्हिडिओंमध्ये रूपांतरित करा. तुमची पार्श्वभूमी निवडा, मंत्रोच्चार ऑडिओ जोडा आणि आधुनिक स्वरूपात गीतेचा प्रकाश पसरवा.

या वैशिष्ट्यांसाठी अॅप डाउनलोड करा

  • उच्च दर्जाची पार्श्वभूमी कलाकृती
  • सिंक केलेले संस्कृत आणि अर्थ मजकूर
  • तल्लीन करणारा मंत्रोच्चार आणि संगीत
Video Generation Preview

खोल विसर्जनाचा अनुभव घ्या

नित्य गीतेच्या पूर्ण आवृत्तीसह सिनेमॅटिक आध्यात्मिक प्रवास सुरू करा. उच्च दर्जाचा मंत्रोच्चार, अस्सल अनुवाद आणि तुमच्या हाताच्या तळव्यावर एक शांत ध्यान अभयारण्य.