विश्वरूपदर्शनयोग - श्लोक श्लोक 51
श्लोक 51
अर्जुन उवाच |
दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन |
इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः ||११-५१||
अनुवाद
अर्जुन म्हणाला: हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्यरूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. ॥ ११-५१ ॥