विश्वरूपदर्शनयोग - श्लोक श्लोक 50
श्लोक 50
सञ्जय उवाच |
इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा
स्वकं रूपं दर्शयामास भूयः |
आश्वासयामास च भीतमेनं
भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ||११-५०||
अनुवाद
भगवान वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा तसलेच आपले चतुर्भुज रूप दाखविले आणि पुन्हा महात्म्या श्रीकृष्णांनी सौम्य रूप धारण करून भयभीत अर्जुनाला धीर दिला. ॥ ११-५० ॥