कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 27 आणि 28
श्लोक 27 आणि 28
स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः |
प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ||५-२७||
यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः |
विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः ||५-२८||
अनुवाद
।।५. २७।। बाह्य विषयांना बाहेरच ठेवून, नेत्रांची दृष्टी भृकुटींच्या मध्यभागी स्थिर करून, तसेच नासिकेत संचार करणाऱ्या प्राण आणि अपान वायूला सम करून, ।। ।।५. २८।। ज्या पुरुषाची इंद्रिये, मन आणि बुद्धी संयत आहेत, असा मोक्षपरायण मुनी इच्छा, भय आणि क्रोधापासून रहित आहे, तो सदा मुक्तच आहे.