कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 22
श्लोक 22
ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते |
आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ||५-२२||
अनुवाद
।।५. २२।। हे कौन्तेय, (इंद्रिये आणि विषयांच्या) संयोगातून उत्पन्न होणारे जे भोग आहेत, ते दुःखाचेच कारण आहेत, कारण ते आदि-अंत असलेले आहेत. बुद्धिमान पुरुष त्यांच्यामध्ये रमत नाही.