दैवासुरसम्पद्विभागयोग - श्लोक श्लोक 13, 14, 15, 16

दैवासुरसम्पद्विभागयोग

श्लोक 13, 14, 15, 16

इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् |

इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ||१६-१३||

असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि |

ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ||१६-१४||

आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया |

यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ||१६-१५||

अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः |

प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ||१६-१६||

अनुवाद

ते विचार करतात की, मी आज हे मिळविले आणि आता मी हा मनोरथ पूर्ण करीन. माझ्याजवळ हे इतके द्रव्य आहे आणि पुन्हा सुद्धा हे मला मिळेल. ॥ १६-१३ ॥ या शत्रूला मी मारले आणि त्या दुसऱ्या शत्रूंनाही मी मारीन. मी ईश्वर आहे, ऐश्वर्य भोगणारा आहे. मी सर्व सिद्धींनी युक्त आहे आणि बलवान तसाच सुखी आहे. ॥ १६-१४ ॥ मी मोठा धनिक आणि मोठ्या कुळात जन्मलेला आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे? मी यज्ञ करीन. दाने देईन. मजेत राहीन. अशा प्रकारे अज्ञानाने मोहित झालेले अनेक प्रकारांनी भ्रांतचित्त झालेले, मोहाच्या जाळ्यात अडकलेले आणि विषयभोगांत अत्यंत आसक्त असे आसुरी लोक महा अपवित्र नरकात पडतात. ॥ १६-१५, १६-१६ ॥

केवळ वाचनापेक्षा अधिक—
तुमचे स्वतःचे ध्यान व्हिडिओ तयार करा.

पवित्र श्लोकांना जगासोबत शेअर करण्यासाठी सुंदर, सिनेमॅटिक व्हिडिओंमध्ये रूपांतरित करा. तुमची पार्श्वभूमी निवडा, मंत्रोच्चार ऑडिओ जोडा आणि आधुनिक स्वरूपात गीतेचा प्रकाश पसरवा.

या वैशिष्ट्यांसाठी अॅप डाउनलोड करा

  • उच्च दर्जाची पार्श्वभूमी कलाकृती
  • सिंक केलेले संस्कृत आणि अर्थ मजकूर
  • तल्लीन करणारा मंत्रोच्चार आणि संगीत
Video Generation Preview

खोल विसर्जनाचा अनुभव घ्या

नित्य गीतेच्या पूर्ण आवृत्तीसह सिनेमॅटिक आध्यात्मिक प्रवास सुरू करा. उच्च दर्जाचा मंत्रोच्चार, अस्सल अनुवाद आणि तुमच्या हाताच्या तळव्यावर एक शांत ध्यान अभयारण्य.