क्षेत्र-क्षेत्रज्ञविभागयोग - श्लोक श्लोक 15, 16, 17
श्लोक 15, 16, 17
सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् |
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च ||१३-१५||
बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च |
सूक्ष्मत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत् ||१३-१६||
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् |
भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ||१३-१७||
अनुवाद
ते चराचर सर्व प्राणिमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. ॥ १३-१५ ॥ तो परमात्मा विभागरहित एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारणपोषण करणारा, रुद्ररूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेवरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ॥ १३-१६ ॥ ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वांच्या हृदयात विशेषरूपाने राहिलेला आहे. ॥ १३-१७ ॥