विश्वरूपदर्शनयोग - श्लोक श्लोक 5
श्लोक 5
श्रीभगवानुवाच |
पश्य मे पार्थ रूपाणि शतशोऽथ सहस्रशः |
नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ||११-५||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), आता तू माझी शेकडो-हजारो नाना प्रकारची, नाना रंगांची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पाहा. ॥ ११-५ ॥