ज्ञानकर्मसन्यासयोग - श्लोक श्लोक 38
श्लोक 38
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते |
तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ||४-३८||
अनुवाद
या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. ॥ ४-३८ ॥