श्रद्धात्रयविभागयोग - श्लोक श्लोक 28
श्लोक 28
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् |
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ||१७-२८||
अनुवाद
।।१७. २८।। हे पार्था! जे यज्ञ, दान, तप आणि कर्म अश्रद्धेने केले जाते, ते 'असत्' म्हटले जाते; ते या लोकी (इह) किंवा मरणानंतर (परलोकी) लाभदायक नसते.