अक्षरब्रह्मयोग - श्लोक श्लोक 9 आणि 10
श्लोक 9 आणि 10
कविं पुराणमनुशासितार-
मणोरणीयंसमनुस्मरेद्यः |
सर्वस्य धातारमचिन्त्यरूप-
मादित्यवर्णं तमसः परस्तात् ||८-९||
प्रयाणकाले मनसाऽचलेन
भक्त्या युक्तो योगबलेन चैव |
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्
स तं परं पुरुषमुपैति दिव्यम् ||८-१०||
अनुवाद
जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण-पोषण करणारा, अतर्क्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो ॥ ८-९ ॥ तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. ॥ ८-१० ॥