अक्षरब्रह्मयोग - श्लोक श्लोक 3
श्लोक 3
श्रीभगवानुवाच |
अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते |
भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः ||८-३||
अनुवाद
परम अक्षर ब्रह्म आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा अध्यात्म नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो. ॥ ८-३ ॥