कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 1
श्लोक 1
अर्जुन उवाच |
संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि |
यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् ||५-१||
अनुवाद
।।५. १।। अर्जुन म्हणाला: हे कृष्णा! तुम्ही कर्मसंन्यासाची आणि नंतर योग (कर्म आचरण्याची) प्रशंसा करता. या दोहोंपैकी जे निश्चितपणे श्रेयस्कर आहे, ते मला सांगा.