कर्मयोग - श्लोक श्लोक 22
श्लोक 22
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन |
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ||३-२२||
अनुवाद
हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), मला या तिन्ही लोकांत काही कर्तव्य नाही आणि मिळविण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही, असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म करीतच असतो. ॥ ३-२२ ॥