कर्मसंन्यासयोग - श्लोक श्लोक 3
श्लोक 3
ज्ञेयः स नित्यसंन्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति |
निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात्प्रमुच्यते ||५-३||
अनुवाद
।।५. ३।। जो पुरुष कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाचीही आकांक्षा करत नाही, तो नेहमी संन्यासीच समजण्याजोगा आहे; कारण, हे महाबाहो! द्वंद्वांतून रहित पुरुष सहजच बंधनमुक्त होतो.