श्रद्धात्रयविभागयोग - श्लोक श्लोक 23
श्लोक 23
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः |
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ||१७-२३||
अनुवाद
।।१७. २३।। 'ॐ, तत् सत्' असा हा ब्रह्माचा त्रिविध निर्देश (नाम) म्हटला आहे; त्याचपासून आदिकाळात (पुरा) ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण झाले आहेत.