विभूतियोग - श्लोक श्लोक 19
श्लोक 19
श्रीभगवानुवाच |
हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः |
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ||१०-१९||
अनुवाद
हे कुरुश्रेष्ठा (अर्थात कुरुवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना), आता मी ज्या माझ्या दिव्य विभूती आहेत, त्या मुख्य मुख्य अशा तुला सांगेन. कारण माझ्या विस्ताराला शेवट नाही. ॥ १०-१९ ॥